UP, मार्च 19 -- मेरठच्या सौरभ राजपूतची त्याची पत्नी मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून हत्या केली होती. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून ड्रममध्ये टाकून सिमेंटने सील बंद करण्यात आले होते. एवढा भयंकर गुन्हा केल्यानंतर पत्नी मुस्कान प्रियकर साहिलसोबत हिमाचल प्रदेशच्या सहलीला गेली होती. पोलीस तपासात या कथेत प्रेम, विश्वासघात आणि खुनाचे सत्य समोर आले आहे.

मुस्कानने सौरभसोबत प्रेमविवाह केला होता. मुस्कान रस्तोगी आणि सौरभ यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. खरं तर सौरभने मुस्कानसोबत जास्त वेळ घालवण्यासाठी मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली. सौरभने नोकरी सोडण्याच्या निर्णयामुळे त्याचे कुटुंबीय नाराज झाले आणि जेव्हा वाद वाढला तेव्हा तो हसत हसत भाड्याच्या घरात वेगळा राहू लागला.

मुस्कानने २०१९ मध्ये म...