Bengluru, फेब्रुवारी 27 -- आपण सगळ्यांनी किती वेळा इडली खाल्ली असेल माहीत नाही. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ इडली माणूस भूक असो वा नसो केव्हाही खाऊ शकतो. दक्षिण भारतात इडली आणि डोसा हे खूप चांगले ब्रेकफास्ट फूड मानले जाते, पण आता इडलीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, काही रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांनी तयार केलेली इडली खाल्ल्यास कॅन्सरदेखील होऊ शकतो. यामुळे केवळ बेंगळुरूच नव्हे, तर देशभरातील नागरिक सतर्क झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरूच्या आरोग्य विभागाने तपासणी केली आहे, ज्यामध्ये काही हॉटेल्स, फेरीवाल्यांनी बनवलेली इडली प्राणघातक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फेरीवाले आणि हॉटेलचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत तपासणी आणि चाचणी केल्यानंतर अनेक नमुन्यांमध...