Mumbai, फेब्रुवारी 7 -- Racist Comment on Chum Darang : सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस १८ संपला असला तरी त्याविषयी चर्चा थांबता थांबत नाही. त्यातील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमुळं रजत दलाल आणि एल्विश यादव वादात अडकले आहेत. त्यांनी चूम दरांग हिच्या नावावरून अश्लील टिप्पणी केली आहे.

बिग बॉसचे स्पर्धक सध्या वेगवेगळ्या पॉडकास्टला मुलाखती देत आहेत. त्यात प्रत्येकजण कुटुंबातील सदस्यांबद्दलचा राग व्यक्त करताना दिसत आहे. नुकताच रजत दलाल बिग बॉस ओटीटी ३ विजेता एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये दिसला. या पॉडकास्टमध्ये बोलताना रजत आणि एल्विशनं बिग बॉसमधील जवळपास सर्वच स्पर्धकांवर जोरदार टीका केली. रजत आणि एल्विश यांनी चुम दरांगच्या नावाची खिल्ली उडवली आणि तिच्यावर अश्लील टिप्पणीही केली. यानंतर सोशल मीडियात दोघांवर...