भारत, फेब्रुवारी 16 -- New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (१५ फेबुवारी) भीषण दुर्घटना घडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ व १६ वर चेंगराचेंगरी झाली असून यात ३ मुलांसह १८ जण ठार झाले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री प्रचंड गर्दी आणि गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ महिला, पाच लहान मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालय आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडाही वाढण्याची...