Nashik, फेब्रुवारी 4 -- Sanjay Raut on Varsha Bunglow in Mumbai: राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. या गोष्टीला आता दोन ते तीन महीने झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्याबाबत ते अद्याप राहायला गेलेले नाहीत. यावरून खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी दावा गेला आहे. त्यांनी नवा मुख्यमंत्री जास्त दिवस टिकू नये या साठी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरून बंगल्यावर जादूटोणा केल्याचं म्हटलं आहे. नाशिक येथे एका कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला आहे.

खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, ते त्यांच...