भारत, फेब्रुवारी 7 -- उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका नवख्या ड्रायव्हरने ताशी १०० किमी वेगाने कार चालवून ६ विद्यार्थिनींना धडक दिली. यात सर्व मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. रक्ताने माखलेल्या विद्यार्थिनी रस्त्यावर पडलेल्या पाहून एकच खळबळ उडाली. या मुली शिर्डी साई शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगंगा विहार येथे ही घटना घडली.

कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. जखमींना विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, आधी या मुलींचा पाठलाग करण्यात आला, त्यानंतर भरधाव कार चालवून त्यांना चिरडले गेले. कारमध्ये पाच तरुण बसले होते, असा दावा त्यांनी केला. कार थांबताच चार तरुण पळून गेले.

रेल्वेच्या शौचालयात उभी राहून तरुणीचा कुं...