PRAYAGRAJ, मार्च 19 -- नवविवाहित तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेने प्रक्षुब्ध झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी सोमवारी रात्री उशिरा सासरच्यांचे घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृत तरुणीचे वृद्ध सासरे आणि सासू दोघेही ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मुठीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्ती चौरा परिसरात ही घटना घडली आहे. आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. तत्काळ बचाव कार्य करून कुटुंबातील इतर पाच सदस्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु आज, मंगळवारी पहाटे या जळालेल्या इमारतीत पोलिसांना आणखी दोन मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या सासरे आणि सासूचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असल्या...