Mumbai, मार्च 20 -- Yuzvendra Chahal and Dhanashree Verma divorce news: युझवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. सध्या लीगमध्ये त्याच्या नावावर २०० हून अधिक विकेट्स आहेत. सध्या चहल त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. २०२० मध्ये चहलने कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी लग्न केले होते.

त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. धनश्रीला युझी चहल याच्याकडून ४.७५ कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार आहे.

युझवेंद्र चहल २०११ पासून आयपीएलचा भाग आहे. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्समध्ये होता. २०११ ते २०१३ दरम्यान मुंबईकडून चहलला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. २०१४ च्या लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले होते....