Mumbai, फेब्रुवारी 6 -- Dhananjay Munde Vr Karuna Sharma Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य केलंन असून त्यांना २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. त्यांना कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. वांद्रे कोर्टाने करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा दिला आहे. या सोबतच करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रूपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेले आरोप न्यायालयाने मान्य केले असून त्यांना घरगुती ...