Mumbai, फेब्रुवारी 7 -- Karuna Sharma on Walmik Karad: वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा २ लाख रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या या निकालानंतर करुण शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना महिन्याला १५ लाख रुपयांच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यावरही खळबळजनक आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. यावेळी धनंजय मुं...