Kalyan, जानेवारी 28 -- कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून जोरदार वाद झाला. या वादातून कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे थार अंगावर घालणारा तरुण परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. परप्रांतीयांच्या दादागिरीच्या घटना एकामागे एक बाहेर येत असतानाच पुन्हा एक घटना घडल्याने मराठी-परप्रांतीय वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

श्लोक सावंत असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव असून सुयश तिवारी असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे.दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाची माहिती मिळताच पोलिसांन...