Solapur, जानेवारी 27 -- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचे वडील कर्तव्यासाठी राजस्थानमध्ये तैनात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,माढा तालुक्यातील मौजे आढेगाव गावात सोमवारी (२७ जानेवारी) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीधर गणेश नष्टे (वय १४ ) असे आत्महत्या शाळकरी मुलाचे नाव आहे. श्रीधरचे वडील गणेश नष्टे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जम्मू-काश्मीरचे बंदुकीचे लायसन्स आहे.

घरच्यांनी लग्नाला नकार देताच प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर उडी,...