Mumbai, फेब्रुवारी 9 -- Gurugram Murder News: गुरुग्राममध्ये लग्नाला नकार दिला म्हणून एका तरुणाने विवाहित महिलेवर गोळ्या झाडल्या. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

उपेंद्र कुमार (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील किशनपूर येथील रहिवाशी आहे. गुरुग्राम सेक्टर-१० ए पोलीस स्टेशनला शुक्रवारी रात्री सेक्टर- ३७ मधील घर क्रमांक-५५३ समोर महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर अवस...