Mumbai, जानेवारी 26 -- Mother Threw Her 9-Month-Old Child: उत्तर प्रदेशच्या बलियामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बहिणीला फसवण्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या ९ महिन्याच्या निष्पाप मुलाला छतावरून खाली फेकले. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या कृष्णा नगर भागात घडली. गोलू गोंड यांची ३५ वर्षीय पत्नी अंजू देवी आपल्या माहेरी कृष्णा नगरमध्ये राहते. त्याची बहीण मनीषा देवीही येथे राहते. दोन्ही बहिणींमध्ये अनेकदा वाद होत असतात. शनिवारी सकाळी बहिणीशी झालेल्या वादात अंजूने आपल्या ९ महिन्यांच्या नवजात मुलाला छतावरून फेकून बहिणीवर तिच्यावर हत्ये...