Pune, जानेवारी 27 -- Nanded City Crime : पुण्यात फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. ग्रॅन्डर अ‍ॅपवरून गे नागरिकांची जवळीक निर्माण करून त्यांना निर्जनस्थळी बोलावून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) याला अटक केली आहे. तर त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेतलं असून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डीएसके रोड ते रायकर मळा येथे काही तरुण गाड्या अडवितात. माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे, असे सांगून गाडीत बसतात. तसेच गाडी घरी घेण्यास सांगून निर्जनस्थळी नेऊन मारहाण करुन पैसे व मौल्यवान वस्तु लुटत असल्याचा एक मेसेज फिरत होता. दरम्यान, या मेसेजची शहनिशा करण्यासाठी नांदेड सिटी पोलिसांनी सापळा रचला. त्...