Jalna, फेब्रुवारी 4 -- पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून विवाहितेला तिच्या चिमुकल्या मुलासह साखळदंडानी २ महिने बांधून ठेवल्याचा मन सुन्न करणारा प्रकार जालना जिल्ह्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर गावात घडला आहे. गावातील एका तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या आई-वडिलांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे.

पीडित महिला लग्नानंतर पाच वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला माहेरी आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासह तिच्या लहान बाळालाही साखळदंडांनी बांधून घरात डांबून ठेवलं. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने दोघांना घरात डांबून ठेवण्यात आलं होतं. आता पोलिसांनी दोघांची सुटका केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार श...