भारत, मार्च 27 -- भारतातून उच्च दर्जाची द्राक्षे निर्यात करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक महिंद्रा अ‍ॅग्री सोल्युशन्स लिमिटेड (MASL) ने भारतीय द्राक्षांची जागतिक बाजारपेठेत निर्यातीच्या क्षेत्रात आज २० वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. २००५ मध्ये महिंद्राने युरोपला पहिल्यांदा द्राक्षांची निर्यात केली होती. महिंद्रा अ‍ॅग्री सोल्युशन्सतर्फे सध्या उत्तर अमेरिका, युरोप, चीन, आग्नेय आशिया आणि इतर अनेक देशांमध्ये उच्चतम दर्जाची गुणवत्ता, सुरक्षा मानके आणि शाश्वत पद्धतींसह द्राक्षे पुरवली जातात.

महिंद्रा अ‍ॅग्री सोल्युशन्सतर्फे पांढरे बिनबियांची थॉमसन आणि सोनाका, लाल बिनबियांची फ्लेम आणि क्रिमसन तसेच काळी बिनबियांची जंबो आणि शरद द्राक्षांची निर्यात केली जाते. ही द्राक्षे 'Saboro' आणि 'Frukinz' या ब्रँडखाली उपलब्ध आहेत.

नाशिकमध्ये असलेल्या...