पूर्णिया, फेब्रुवारी 16 -- Viral News : आत्तापर्यंत तुम्ही कुटुंबांमध्ये जमीन-जुमला, घर व दाग-दागिन्यांची वाटणी झाल्याचे ऐकले असेल. मात्रबिहार राज्याच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका पतीचीदोन पत्नींमध्येवाटणी केली आहे.पती पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून३दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबतपुढचे३दिवसराहत असून रविवारी पतीला दोन पत्नींपैकी कोणत्या पत्नीसोबत राहायचे किंवा सुट्टी घ्यायचा अधिकार देण्यात आला आहे.

बिहारमध्ये एका व्यक्तीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दोन विवाह केले. आता या गोंधळानंतर पतीची विभागणी करण्यात आली आहे. आठवड्यातील सात दिवसांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. या ड्यूटीतून त्याला एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी पोलिस फॅमिली कौन्सि...