भारत, मार्च 13 -- देशभरातील आरोग्य व्यवस्था सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी आरोग्य सेवांचे सुलभीकरण आणि लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. अभय बंग यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले यावेळी उपस्थित होते.

डॉ. बंग म्हणले, 'आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारताना मनामध्ये थोडीशी धाकधूक आहे. कारण, आजपर्यंत या पुरस्कारांच्या यादीमध्ये अनेक दिग्गज मान्यवरांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज माणसाच्या नावाने हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आहे आणि त्यांचे वारस म्हणून ज्यांना मानलं जातं, त्या शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतोय, याचा वेग...