Dombivli, जानेवारी 26 -- आपल्या आजुबाजुला अनेक दैवी चत्मकाराच्या घटना घडल्याचे दिसून येतात. डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात एक थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात इमारतीच्यातिसऱ्या मजल्यावरून २ वर्षांचा चिमुरडा खाली पडल्याची घटना घडली. चिमुकला खाली पडताच सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र चिमुरडा खाली पडत असल्याचे दिसताच या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाने त्याला अलगद झेलत त्याचा जीव वाचवला. भावेश म्हात्रे असे या धाडसी तरुणाचे नाव आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भावेशने त्याने जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली. दरम्यान हा चिमुरडा त्याच्या हातावर आला आणि नंतर तो पायावर पडला. या घटनेत चिमुकला किरकोळ जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे.

Mumbai Coastal Road : कोस्टल रोडचं लोकार्पण, आता मरिन ड्राईव्ह ते वांद्रे अ...