Solapur, फेब्रुवारी 10 -- Solapur Mohol Accident: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आज सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. काही भाविक हे मिनीबस मधून देवदर्शनासाठी जात असतांना, समोरून येणाऱ्या भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने आधी दुचाकीला व नंतर मिनी बसला धडक दिली. या घटनेत तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत.

मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला. या अपघातानंतर घटनास्थळी जखमींचा मोठा आक्रोश झाला होता. तसेच वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेत दुचाकी चालक दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळेवाडी ये...