Mumbai, मार्च 3 -- पुणे: दातांमध्ये पोकळी आणि हिरड्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या वाढत चालली आहे. दहा मुलांपैकी किमान दोन मुलांना दात किडण्याच्या समस्येने ग्रासले आहे. त्यात दुधाचे दात किडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे दात आता पडणारच आहेत म्हणून त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, ते चुकीचे असून हे दात किडून नाही तर नैसर्गिकपणे पडणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना नियमित डेन्टल चेकअपसाठी घेऊन जाणे व दुधाच्या दातांच्या कुठल्याही समस्या असल्यास त्वरित दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे .

रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपून जातात. असे केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून...