Mumbai, फेब्रुवारी 27 -- सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये पाठीच्या कण्याला सूज येते. हा रोग प्रामुख्याने मानेच्या मणक्याला प्रभावित करतो. सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा एक जीवनशैलीचा आजार आहे. ही समस्या स्पाईनचा सर्वात वरच्या भाग सर्व्हायकल स्पाईनमध्ये उद्भवते. म्हणूनच याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात. २०% तरुण प्रौढांना बैठी जीवनशैली,शारीरीक हलचालींचा अभाव आणि चुकीच्या पध्दतीने बसणे व झोपल्याने मणक्याच्या विकाराने ग्रासले आहे. मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, वाढता स्क्रीन टाइम आणि बसण्याच्या चुकीच्या स्थिती हे याचे प्रमुख कारण ठरत आहे.

सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा मानेच्या मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या अवस्थेत हाडे आणि कुर्चा यांच्या मध्ये बिघाड झाल्याने मानेमध्ये अत्यंत वेदना होत असतात या चुकी...