New delhi, फेब्रुवारी 10 -- 'आप'चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबवर लक्ष केंद्रीत केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आमदारांच्या माध्यमातून दबाव आणून केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर केजरीवाल यांनी पंजाबचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली होती.

भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले, 'दिल्ली निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पंजाबच्या आमदारांची बैठक बोलावली होती. भगवंत मान यांना नालायक , अयोग्य म्हणत महिलांना हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीला आळा घालता येत नाही, पंजाबमध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. असं म...