Mumbai, फेब्रुवारी 9 -- लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने हत्या केलेल्या श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे रविवारी मुंबईतील वसईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती, ज्यात पूनावाला याने तिच्या मृतदेहाचे किमान ३५ तुकडे करून सुमारे तीन महिने फ्रीजमध्ये ठेवले होते आणि मृतदेहाचे तुकडे दक्षिण दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले होते.

वसई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास वालकर (वय ५९) यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्या मुलाने रविवारी पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काही महिन्यांपूर्वी 'एचटी'शी बोलताना त्यांनी मुलीच्या अस्थींची वाट पाहत असल्याचे सांगत मुलीला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त क...