Mumbai, फेब्रुवारी 9 -- Rohit Pawar News: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. त्यानुसार राज्यातील विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ जागा जिंकून भाजपने दोन तृतीयांशहून अधिक बहुमत मिळवले असून आता २७ वर्षांनंतर येथे सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढे काम करुनही अरविंद केजरीवाल यांचा पराभवझाला, अशा शब्दात रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या. तर, आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा जिंकता आल्या. याशिवाय, काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. दिल्ली विधानसभेचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला. दरम्यान, रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली ...