नई दिल्ली, फेब्रुवारी 5 -- Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज बुधवारी मतदान होणार आहे. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांचे भवितव्य १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत. सर्व ७० विधानसभा मतदारसंघातील १३ हजार ७६६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या, दिल्ली पोलिसांचे ३५ हजार ६२६ जवान आणि १९ हजार होमगार्डतैनात केले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजधानीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सीमेवरील चौक्यांवर कडक तपासणी मोहीम राबविली जात आहे. दिल्लीत येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू न...