New Delhi, फेब्रुवारी 7 -- Asaram Bapu Ads : बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापू याच्या जाहिरातींचे पोस्टर दिल्ली मेट्रोत लावण्यात आल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका वकिलानं मेट्रोतील हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.

मातृपितृ पूजन दिवसाच्या या जाहिराती आहेत. स्वयंघोषित अध्यात्मिक बाबा आसारामचे अनुयायी व्हॅलेंटाइन दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा करतात. त्याच्या या जाहिराती आहेत. मात्र यावर एका वकिलानं तीव्र आक्षेप घेतला आहे.

'बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या आणि तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराची पोस्टर्स आणि छायाचित्र दिल्ली मेट्रो रेल्वेमध्ये लावण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? #delhimetro हे अत्यंत लज्जास्पद कृत्य आहे,' अशी पोस्ट एका वकिलानं मायक्रोब्लॉगिं...