New delhi, फेब्रुवारी 5 -- Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. आता ८ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार की अडीच दशकांनंतर भारतीय जनता पक्षा सत्तेचा दुष्काळ संपववून दिल्लीत कमळ फुलवणार हे समजेल. मात्र, बहुतांश एक्झिट पोलमध्ये यंदा दिल्लीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होईल, असा अंदाज मेटराइजच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार भाजप आणि 'आप'मध्ये चुरशीची लढत असून, त्यात भगव्या पक्षाला किंचित आघाडी मिळू शकते. एक्झिट पोलमध्ये भाजपला ३५ ते ४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला ३२ ते ३७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्र...