दिल्ली, मार्च 23 -- दिल्लीच्या नैर्ऋत्य जिल्ह्यातील डिअर पार्कमध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मुलगा आणि एका मुलीचे मृतदेह आढळले. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. पुढील तपास सुरू आहे. उद्यानात अचानक एका मुला-मुलीचे मृतदेह सापडल्याने स्थानिकही हैराण झाले आहेत. या दोघांचे मृतदेह झाडावर सापडल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने सर्वप्रथम दिली.

आज सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी बलजीत सिंग (वय ३५, रा. हौज खास गाव, दिल्ली) यांनी पीसीआर कॉल करून एक मुलगा आणि एक मुलगी झाडाच्या फांदीवर लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली. फोन येताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

झाडाला लटकलेल्या मुलाची आणि मुलीची ओळख पटली आहे. दीपक असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय २१ वर्षे असून तो दिल्लीतील झो...