नई दिल्ली। एजेंसी, फेब्रुवारी 22 -- Delhi Chief Minister Rekha Gupta salary: रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आता त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी ठरवून दिलेल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. पगार, बंगला, वाहन, सुरक्षा, मोफत उपचार, मोफत वीज आदी सुविधा त्यांना मिळणार आहेत.

मार्च २०२३ च्या आदेशानुसार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा १,७०,००० रुपये पगार मिळतो. मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांना तेवढाच पगार मिळणार आहे. यामध्ये त्यांचा बेसिक पगार ६० हजार रुपये असेल. याशिवाय त्यांना अनेक प्रकारचे भत्ते मिळणार आहेत. सीएम रेखा गुप्ता यांना ३० हजार रुपये विधानसभा भत्ता मिळणार आहे. त्यांना २५ हजार रुपये सचिवीय मदत, १० हजार रुपये दूरध्वनी भत्ता, १० हजार रुपये प्रवास भत्ता आणि १५०० रुपये दैनंदिन भत्ता मिळणार आहे.

म...