Delhi, फेब्रुवारी 16 -- Tahawwur Rana NIA Update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी भारताच्या सुरक्षा यंत्रणेने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वुर राणाला भारतात आणण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. राणाला भारतात आणण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून ते केव्हाही अमेरिकेला जाऊ शकतं. या प्रक्रियेसाठी भारत सरकारने अमेरिकी प्रशासनाकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. 'सरेंडर वॉरंट' जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

एनआयएच्या तीन सदस्यीय पथकात महानिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी असेल, अशी माहिती सूत्रांनी ...