Mumbai, फेब्रुवारी 6 -- Airtel, Jio Introduced Great Plans: एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन- आयडियाच्या ८४ दिवसांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळत आहेत. याशिवाय, या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टारचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे.

रिलायन्स जिओ युजर्संना ९४९ रुपयांच्या प्लॅनसह रिचार्जवर दररोज २ जीबी डेटा आणि ८४ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. युजर्संना दररोज १०० एसएमएस पाठवता येतील. रिचार्ज केल्यावर डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन तीन महिन्यांसाठी दिले जात असून जिओ अ‍ॅप्सचा (जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओक्लाऊड) अ‍ॅक्सेस मिळतो. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड ५जी डेटा दिला जात आहे.

एअरटेलच्या वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देणाऱ्या ...