Mumbai, फेब्रुवारी 11 -- Mukesh Khanna News : समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या रिअॅलिटी शोमध्ये आई-वडील व मुलांच्या नात्याबद्दल अत्यंत घाणेरडं आणि अश्लील वक्तव्य करणारा यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्यावर अभिनेते मुकेश खन्ना प्रचंड चिडले आहेत. 'अशा लोकांचं तोंड काळं करून त्यांना गाढवावर बसवून शहरभर फिरवलं पाहिजे,' असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) मधील वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) यानं माफी मागितली असली तरी लोक त्याला माफ करायला तयार नसल्याचं दिसत आहे. त्याच्या विरुद्ध देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. केंद्र सरकारनं यूट्यूबला आदेश देत तो एपिसोड ब्लॉ करायला लावला आहे. दुसरीकडं, विविध घटकांकडून अलाहाबादियावर टीकेची झोड उठली आहे.

'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना ह...