भारत, एप्रिल 18 -- बॉलिवूडमधील सध्याची हॉट आणि फिट अभिनेत्री म्हणून मलायका ओळखली जाते. तिने वयाची ५०शी ओलांडली असली तरी ती सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत एखाद्या तरुण अभिनेत्रीला टक्कर देताना दिसते. आता मलायकाचा मुलगा अरहान खानने स्वत:चा पॉडकास्ट शो 'डम्ब बिरयानी' सुरु केला आहे. या शोमध्ये त्याने आई मलायकाला बोलावले आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने मलायकाला दुसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. आता मलायकाने यावर काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

अरहानने मलायकाचा हात पकडला आणि प्रश्न विचारला की, 'संपूर्ण जगाला हे जाणून घ्यायचे आहे की तू लग्न कधी करणार आहेस? मला एक पक्की तारीख हवी आहे, मला सगळं जाणून घ्यायचे आहे. तू कुठे, कोणासोबत आणि कधी लग्न करणार आहेस?' या प्रश्नावर मलायकाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'मी या...