Japan, फेब्रुवारी 3 -- जपानमधील वृद्ध लोकसंख्येसाठी एकटेपणा ही सर्वात मोठी सामाजिक समस्या म्हणून उदयास येत आहे. यामुळे वृद्धांकडून कायदे मोडले जात आहेत. नुकतेच एका ८१ वर्षीय महिलेने असेच केले. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिने मुद्दाम कायदा मोडला, त्यामुळे पोलिसांनी तिला तुरुंगात टाकले.

टोकियोतील तोचिगी महिला कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ओकिओ म्हणाल्या की, तुरुंगात आल्याने तिच्या आयुष्यात स्थैर्य आले आहे. "मी वयाच्या ६० व्या वर्षी पहिल्यांदा असं केलं, जेव्हा मला अन्न चोरल्याबद्दल तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यानंतर तुरुंगात मला चांगले अन्न आणि निवारा मिळाला, म्हणून मी हे करण्याचा निर्णय घेतला. जपान सरकार वृद्धांसाठी पेन्शन सेवा चालवते, पण त्यात जगणे खूप कठीण आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार...