भारत, जून 19 -- स्कोलियोसिस ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये पाठीचा कणा एका बाजूला वळतो. स्कोलियोसिसमध्ये, तुमचा मणका डावीकडे आणि उजवीकडे C किंवा S आकारात वळतो. ही स्थिती सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. बालपण किंवा पौगंडावस्थेत जेव्हा तुमची हाडं वाढतात तेव्हा ती विकसित होण्याची शक्यता जास्त असते. स्कोलियोसिस नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र न्यूरोलॉजिकल स्थिती, अनुवांशिकता किंवा काही आरोग्य समस्या यास कारणीभूत ठरतात. सुरुवातीला अनेकांना वेदना किंवा कोणतीही मोठी लक्षणे देखील जाणवत नाहीत, ज्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मुंबई येथील स्पाइन अँड स्कोलियोसिस सर्जन प्रा. डॉ. धीरज सोनवणे यांनी याबाबत काही गैरसमजूती आणि त्याचे वास्तव सांगितले आहे.

गंभीर प्रकरणांमध्ये, स्कोलियोसिस एखाद्याच्या हालचालीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, ...