भारत, फेब्रुवारी 12 -- पंचम निषाद आणि यशवंतराव चव्हाण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीन सूर तीन ताल - संगीतमय तिहाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित असून गायन आणि वादनाच्या माध्यमातून युवा कलाकार त्यांना स्वर आदरांजली वाहणार आहेत. वाय. बी. चव्हाण सभागृह नरिमन पॉईंट, मुंबई येथे रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून कार्यक्रम दिवसभर चालणार आहे.

उस्ताद झाकीर हुसेन शरीररूपाने आज आपल्यात नसले तरी त्यांच्या संगीतातून, प्रत्येक ठेक्यातून, लयीतून त्यांची उपस्थिती आजही आपल्यात आहे. त्यांची अतुलनीय कला, नम्रता आणि भारतीय शास्त्रीय संगीताप्रती असलेली त्यांची ओढ कायम आहे. त्यांच्या वादनातून अनेक पिढ्यात...