Mumbai, फेब्रुवारी 11 -- Nalco Share Price : नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडच्या (नाल्को) नं सोमवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली. कंपनीनं डिविडंडची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये आज बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत.

कंपनीच्या संचालक मंडळानं १० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दुसऱ्या अंतरिम लाभांशाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेअरहोल्डर्सना प्रत्येक शेअरवर ४ रुपये मिळणार आहेत. हा लाभांश देण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. लाभांशाची रक्कम सर्व पात्र भागधारकांना १० मार्च २०२५ रोजी किंवा त्याआधी दिली जातील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत नाल्कोचा निव्वळ नफा ३ पटीने वाढला आहे...