Mumbai, फेब्रुवारी 13 -- Natco Pharma Dividend News : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत मोठा तोटा झाल्यामुळं नॅटको फार्माच्या शेअरमध्ये तब्बल १९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तिमाही निकालांसह कंपनीनं डिविडंड जाहीर केला होता. मात्र, डिविडंडची घोषणा गुंतवणूकदारांना शेअर विक्रीपासून थांबवू शकलेली नसल्याचं दिसत आहे.

नॅटको फार्मा कंपनीनं बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकाल जाहीर केले. त्यानुसार, कंपनीचा निव्वळ नफा 37.75 टक्क्यांनी कमी होऊन १३२.४ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा २१२.७० कोटी रुपये होता.

आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत नॅटको फार्माचं कामकाजातून एकत्रित उत्पन्न ३७.४ टक्क्यांनी घटून ४७४.८ कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ७५८.६ कोटी रुपये होतं. व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्...