Pune, फेब्रुवारी 11 -- Tanaji Sawant Son News : राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. या प्रकरणी तानाजी सावंत यांनी पोलिसांना तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी देखील तपास सुरू करत वेगाने चक्रं फिरवली. या तपासात ऋषिराज हा त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला जास्त असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, तानाजी सावंत यांनी आपला वट वापरुन बँकॉकला जाणारे विमान चेन्नई येथे थांबवलं. तसेच ऋषिराजला पुण्यात आणण्यात आलं.

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विमान तळावर कारमधून गेला. येथून टु त्याच्या मित्रांसह चार्टर्ड विमानाने बँकॉकला जात होता. हे विमान बूक करण्यासाठी त्याने तब्बल ६८ लाख रुपये मोजल्याचे पुढे आ...