Dhaka, फेब्रुवारी 11 -- Chaos Again Over Taslima Nasreens Book : बांगलादेशची राजधानी ढाका येथे लेखिका तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला आहे. नसरीन यांनी लिहिलेलं पुस्तक बाळगल्याबद्दल मदरशातील विद्यार्थ्यांनी प्रकाशकाला मारहाण केली. तसेच पुस्तकांचा स्टॉलही फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नसरीन यांनी हा व्हिडिओ शेअर करत बांगलादेश सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मदरशाच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने ढाका येथे आयोजित अमर एकुशे बुक स्टॉलवर हल्ला केला. याचे कारण म्हणजे नसरीन यांचे पुस्तक या स्टॉलमध्ये ठेवण्यात आले होते. नसरीन यांचे प्रकाशन सब...