US, मार्च 19 -- Sunita Williams Return: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता आणि बुच यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर, अमेरिकेचा निक हेग आणि रशियाचा अलेक्झांडर गोर्बुनोव्ह होते. भारतीय वेळेनुसार १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी त्यांचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. नासाने या यशस्वी पुनरागमनाला दुजोरा दिला आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना चालताना त्रास होऊ शकतो, थकवा जाणवू शकतो आणि परतीच्या काळात इतर अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी जास्त काळ मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं.

पृथ्वीवरील ग...