Delhi, फेब्रुवारी 17 -- Dangerous Asteroid may hit India : पृथ्वीच्या दिशेने एक मोठ संकट वेगानं येत आहे. एक मोठा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता नासाने वर्तवली असून याचा सर्वाधिक धोका हा भारत आणि चीनला आहे. जर हा लघुग्रह कोसळल्यास भारतात मोठा विध्वसं होऊ शकतो.

पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या लघुग्रहाबाबत शास्त्रज्ञांनी भयावह भविष्यवाणी केली आहे. या लघुग्रहाला लघुग्रह २०२४ वायआर ४ असे नाव देण्यात आले आहे. हा एका मोठ्या विमानाचा आकाराचा खडक असून तो २०३२ मध्ये पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यावेळी मोठा स्फोट होण्याची ही शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणात या लघुग्रहाने प्रवेश केल्यास त्याचा वेग ताशी ३८ हजार किलोमीटर असेल. त्याचबरोबर या लघुग्रहामुळे अनेक शहरे उद्ध्वस्त होतील. चीन, पाकिस्तान आणि भारताला या लघु...