भारत, फेब्रुवारी 21 -- आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि डिजिटल तंत्रज्ञान यामुळे उद्योगांचे स्वरूप बदलत असताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्योग-व्यवसायांनी आपल्या कर्मचारीवर्गाच्या कौशल्ये वाढीसाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यवसायांची भरभराट होण्यासाठी कोणत्या सहा सूत्रींवर भर दिला पाहिजे यावर प्रकाश टाकणारा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक के. कृतिवासन यांचा हा लेख..

कोणताही बदल हा निश्चितच अस्वस्थ करणारा असतो. यशस्वी नेते मात्र हे बदल चटकन स्वीकारत असतात. त्यांना माहीत असते की या अस्वस्थतेच्या पलीकडे काही चांगल्या संधी दडलेल्या आहेत. उद्योग, व्यवसायांच्या बाबतीत तर हा दृष्टिकोन अधिकच महत्वाचा आहे. अनिश्चिततेची परिस्थितीत अनेक उद्योग लवचिकता दाखवून प्रगती साधण्याची क्षमता दाखवून देत अस...