Pune, जानेवारी 23 -- Donald Trump Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माने नागरिकत्व देण्याच्या निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतल्याने गरोदर महिलांची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रसूतीपूर्व तारखेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी या महिला दवाखान्यात धाव घेत आहेत. अमेरिकेचा नवा कायदा हा २० फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे हा कायदा लागू होण्यापूर्वी अनेक गरोदर महिलांना बाळाला जन्म द्यायचा आहे. ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अनेक अमेरिकन नागरिकांचा या निर्णयाला विरोध असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना न्यू जर्सीचे डॉ. डी. रामा यांनी सांगितलं की, त्यांच्या रुग्णालयात मुदतपूर्व बाळाला जन्म देण्यासाठी गरोदर महिलांची संख्या वाढली आहे. यापैकी बहुत...