Delhi, मार्च 3 -- Zelenskyy gets big support from Europe : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर अनेक युरोपीय देश युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. ब्रिटन आणि फ्रान्स हे दोन्ही देश युक्रेनसोबत शस्त्रसंधी योजनेवर काम करण्यास तयार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केरी स्टार्मर यांनी युक्रेनला पाच हजार संरक्षण क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी १.६ अब्ज पौंडची (सुमारे २ अब्ज अमेरिकन डॉलर) मदत देणार असल्याचे जाहिर केले आहे. अशा तऱ्हेने युक्रेनला युरोपचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. ओव्हल हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिका उघडपणे रशियासोबत येऊ शकते आणि अशा परिस्थितीत झेलेंस्कीसाठी ते अवघड जाईल, असे मानले जात होते. मात्र, आता युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीय देश सक्रिय झाले आहे. ...