New delhi, फेब्रुवारी 24 -- दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. आमदारांच्या शपथविधीनंतर विजेंदर गुप्ता यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी मार्लेना यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवण्यात आल्याचा आरोप करत आतिशी यांनी गदारोळ घातला. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी त्यांना फटकारले आणि नंतर गदारोळ थांबला नाही तेव्हा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

खरं तर शपथ घेतल्यानंतर विरोधी पक्षनेत्या आतिशी आपल्या आमदारांसह मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेण्यासाठी विधानसभेत असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या. महिला समृद्धी योजनेसंद...