Mumbai, फेब्रुवारी 17 -- काही दिवसापूर्वी एका फ्रेंच व्यक्तीच्या कृष्ण कृत्याची बातमी समोर आल्यानंतर जगभरात खळबळ माजली होती. पत्नीला नशेच्या गोळ्या देऊन तिच्यावर ५० हून अधिक व्यक्तींकडून बलात्कार केल्याप्रकरणी पतीला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता अशीच आणखी एक बातमी फ्रान्समधून समोर आली आहे. फ्रान्समधील एका माजी शल्यचिकित्सकावर या महिन्याच्या अखेरीस खटला चालणार आहे. या डॉक्टरवर जवळपास ३०० रुग्णांवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर शल्यचिकित्सकांनी बळी पडलेले बहुतांश पीडित ही लहान मुले असून त्यातील अनेक जण त्यावेळी बेशुद्धावस्थेत होते. ७४ वर्षीय जोएल ले स्कॉर्नेक याच्यावर २५ वर्षे हे गुन्हे करत होता.

रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने १९८९ मध्ये या गुन्ह्याच्या मालिकेला सुरूवात केली होती....