Karnataka, फेब्रुवारी 23 -- Woman Suffers After C-Section in Karnataka :ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच उत्तर प्रदेश राज्यातील बरेली येथे एका महिलेवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिच्या पोटातच स्पंज सोडला होता. यामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात पाच डॉक्टर दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. असाच प्रकार आता कर्नाटक राज्यातील मंगळूरु येथून समोर आला आहे.

मंगळुरु येथील एका रुग्णालयात एका डॉक्टरने सी-सेक्शन सर्जरी दरम्यान एका महिलेच्या पोटात सर्जिकल मॉप सोडला होता. यामुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. जवळपास २ महिने मॉप पेटात राहिला होता. त्रास होऊ लागल्यानंतर महिलेने सीटी स्कॅन केले, त्यानंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला. महिलेचे तत्काळ ऑपरेश...